“शिवसेनेने कोणत्याही स्वरुपात माघार घेतलेली नाही ; जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल”- खा. संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी । युती सरकार सत्ता स्थापनेचा अजून तिढा सुटलेला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेना काहीसी नरमली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्याने यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

“शिवसेना नरमली, माघार घेतली, तडजोड केली किंवा समसमान पदांची मागणी सोडली..वगैर पुडया सुटू लागल्या आहेत. ये पब्लिक है, सब जानती है. जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल.” असे उत्तर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.

सत्तेमधील पद व जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होईल असे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री यांनी युती बाबत भूमिका व्यक्त केली होती. त्यामुळे जे आधीच ठरले होते त्या प्रमाणेच होईल. असे राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल होत.