औरंगाबाद : फर्निचर व इलेक्ट्रिकल्स दुकानाची तीन पत्रे उचकाटून रोख रकमेसह एक लाख 90 हजार 780 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना 27 जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील गोविंद विष्णुदास मुंदडा यांचे नरसी फाटा येथे संत नामदेव फर्निचर अँड इलेक्ट्रिकल्स दुकान आहे 27 जून चा पहाटे त्यांच्या फर्निचर दुकानाचे टिनपत्रे वाकल्याचे दिसले याची माहिती गोविंद मुंदडा यांना समजताच त्यांनी दुकानात पाहणी केली आहे.
दुकानातील एक लाख 38 हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांचे एलईडी टीव्ही,तसेच रोख 52 हजार 700 रुपये चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले या घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक कांबळे,रवी हरकळ गजानन पोकळे, अशोक धामणे, किशोर पारीसकर, क्षीरसागर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी गोविंद मुंदडा यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे घटनेचा तपास आणि बळीराम बंद खडके करीत आहे.