हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सतत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, प्रवाशांच्या सोयीसाठी कोकणात विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. पण , 25 जानेवारी रोजी घडलेल्या एका प्रकारामुळे कोकणातील प्रवाशांना मात्र नवा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणात सिंधुदुर्गला उतरणारे विमान थेट गोव्याला उतरले . त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला . तर चला हि घटना घडण्यामागे नेमके कारण काय आहे हे पाहुयात.
सिंधुदुर्गला उतरणारे विमान थेट गोव्याला उतरले –
25 जानेवारी रोजी मध्यरात्री फ्लाय 91 चे विमान पुण्याहून सिंधुदुर्गसाठी निघाले होते, ज्यामध्ये 45 प्रवासी प्रवास करत होते. विमानाची योजना सिंधुदुर्गच्या चीपी विमानतळावर उतरण्याची होती. पण , खराब हवामानामुळे विमानाला चीपी विमानतळावर न उतरवता थेट गोव्यातील मोपा विमानतळावर उतरवण्यात आले.
पुन्हा बायरोड प्रवास करावा लागला –
या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यांना आपल योग्य स्थान असलेल्या सिंधुदुर्गसाठी पुन्हा बायरोड प्रवास करावा लागला. या प्रवासामुळे त्यांचा अधिक वेळ वाया गेला , त्यामुळे अनके प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अनेक प्रवाशांनी विमान सेवेच्या गोंधळामुळे आणि वेळेच्या अपव्ययामुळे तीव्र संताप व्यक्त केला.
नाइट लँडिंगची मागणी –
तांत्रिक कारणांमुळे, हवामान खराब असल्यानं विमान गोव्यात लँड करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी कारने त्यांना मोफत सिंधुदुर्गमध्ये आणण्यात आले, मात्र हा प्रवास वेळ आणि आरामासाठी अपेक्षेइतका सोयीस्कर नव्हता. चिपी विमानतळावर नाइट लँडिंग सुविधा न होणं आणि रद्द होणारी विमानसेवा यामुळे प्रवाशांनी मागणी केली आहे की, चिपी विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जावी, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या गोंधळांना तोंड देण्याची वेळ येणार नाही.
हे पण वाचा : कोरोनाची उत्पत्ती कशी झाली? ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा