आवटे कुटुंबाची सामाजिक बांधिलकी, आजीच्या मातीचा होणारा खर्च आरोग्य सुविधेसाठी

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

कराड येथील अख्तर आवटे आणि फजलेकरीम मांगलेकर यांच्या आजीचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोनामुळे गर्दी न करता सर्व विधी पार पाडले गेले. तेव्हा लोकांना बोलवून गर्दी करण्याऐवजी आजीचा मातीला होणारा खर्च “मातोश्री 4 केअर फौंडेशनच्या खिदमत क्लिनिक” साठी सामाजिक कार्यासाठी दिला.

सध्या कोरोना काळात अनेकांचे आरोग्य सुविधा अभावी निधन होत आहे. अशावेळी अख्तर आवटे आणि त्यांच्या कुटुंबियांनी माणुसकीचा निर्णय घेतला. तसेच समाजाला एक आदर्श निर्माण होईल, असे काम केले आहे.

दिनांक 10 मे रोजी आजीचे निधन झाले होते. त्यानंतर मातीचा कार्यक्रम रद्द करून होणारा खर्च सर्व खर्च कराड तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ पणे काम करणाऱ्या “मातोश्री 4 केअर फौंडेशनच्या खिदमत क्लिनिक” साठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला मानुसिकचा निर्णय हा नक्कीच आदर्श ठरेल, असे उदगार संस्थेच्यावतीने काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here