औरंगाबाद : टीव्ही सेंटर मैदानावर उभारणार स्टेडियम व्यापारी संकुलच्या आतील बाजूस स्टेडियम तयार करून मुलांसाठी खेळायचे मैदान तयार केली जाणार आहे. त्याकरिता पीएमसीची नियुक्ती करून डीपीआर तयार केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली. टीव्ही सेंटर येथील मैदानाच्या दोन्ही बाजूंनी व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. आता व्यापारी संकुलाच्या आतील बाजूस स्टेडियम तयार केले जाणार आहे.
मनपा प्रशासन तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय या याबद्दल माहिती देताना म्हणाले की, ‘गरवारे स्टेडियम आणि टीव्ही सेंटर येथे मुलांना खेळण्यासाठी मैदाने तयार करण्याचा विचार असून गरवारे स्टेडियमच्या मोकळ्या मैदानावर फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल बास्केटबॉल मैदानी तयार करायचे आहेत. स्विमिंग पूलचे काम थांबलेली असून त्याला देखील सुरुवात केली जाणार आहे तसेच हॉल मध्ये टेबल टेनिस कोर्ट केले जाईल’.
दुसऱ्या टप्प्यातील विकास म्हणून टीव्ही सेंटरचा विकास केला जाणार आहे. याठिकाणी स्टेडियम तयार करून मैदाने विकसित केले जातील त्याकरिता पीएमसीची नियुक्ती करण्यात येईल. पीएमसी कडून डीपीआर बनवून त्यास मान्यता दिली जाईल त्याकरिता राज्याचा युवक व क्रिडा कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली जाईल. क्रीडा विभागाकडून मदत करण्याचे आश्वासन बाकी कोरिया यांनी दिले असल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.