सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सध्याचे वातावरण कोणी बिघडवले हे पाहणे गरजेचे आहे. मला पहायला ‘टॉम ॲण्ड जेरी’ पहायला आवडते. पण सध्या ते पण बघायचे बंद केले आहे. आता ज्या माकड उड्या ज्या चाललेल्या आहेत, त्या बघत बसतो. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ‘ईडी’ द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. आता ‘ईडी’ म्हणजे चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ‘ईडी’ची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढली पाहिजेत,” अशी सडेतोड टीका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
उदयनराजेंनी आज कास धरण व परिसरातील कामाची पहाणी केली, त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीकडे कसे पाहता असे विचारले. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तरे देत महाविकास आघाडीसह इतर नेत्यांवर जहरी टीका केली.
कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, ”कोल्हापूरला उत्कृष्ठ सभा झाली. भरपूर लोक आले होते. एवढी लोक आली त्यावेळी तुमची डिलेव्हरी काय होती. तर ती झिरो होती. एका बाजूला फूटपाथवर लोक जगतायत. कसे जगत आहेत. या लोकांना दिसत नाही. मात्र, एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत.
महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल
दोन वर्षे ते जेलमध्ये होते, त्यांनी काय केले नाही. जे आता जेलमध्ये आहेत, त्यांनीही काय केलेले नाही. लोकांना काय डोळे, मेंदू नाहीत, असे वाटते काय, असे सांगून उदयनराजे म्हणाले, लोक हसतात. आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. पण माझे नाव कोणी घेतले तर मी कोणाच्या नादी लागत नाही. माझं नांव घेतल ना