राज्यातील ‘हे’ शासकीय रूग्णालय कोविड रूग्णालयात रूपांतर होणार; ओमियोक्रॉनचा धोका वाढला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज शासकीय रूग्णालय हे 17 तारखेपासून नॉनकोविड हॉस्पिटल बंद करून कोविडमध्ये रूपांतर होणार आहे. ओमियोक्रॉनचा फैलाव झपाट्याने होत असून त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अधिष्ठाता डॉ.सुधीर ननंदकर पुढे म्हणाले, आता मिरज शासकीय रूग्णालयात जे नॉनकोविड रूग्ण आहेत त्यांना डिसचार्ज करण्यात येणार आहे. शासकीय रूग्णालयात आता 38 टन ऑक्सिजनची क्षमता निर्माण झाली आहे. रूग्णालयात 135 व्हेंटीलेटर सज्ज आहेत. कोणत्याही परिस्थितीवर रूग्णालय प्रशासन सज्ज आहे.

नागरीकांनी ओमिक्रॉनला घाबरून जावू नका. ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने होते परंतु त्याच्यावर मात करायची असेल तर मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टी पाळाव्याच लागतील. तसेच गर्दी करू नये. जेवढी गर्दी कमी असेल तितका धोका कमी असणार आहे. लसीकरणामुळे नागरीकांची सुरक्षितता वाढली आहे. लसीकरणावरही भर देणे जरूरीचे आहे.

अधिष्ठाता डॉ.नणंदकर म्हणाले, मिरज शासकीय रूग्णालय गेल्या 20 महिन्यापासून कोविड रूग्णालयात रूपांतर झाले होते. कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्याने परत नॉनकोविड रूग्णालयात रूपांतर केले होते. आता नवीन ओमियोक्रॉनमुळे आतापासून तयारी म्हणून 17 तारखेपासून कोविड रूग्णालय सुरू होत आहे.

तत्पुर्वी 10 तारखेपासून ओपीडी,आयपीडी, सर्जरी बंद होणार आहे. एर्मजन्सी मेडीसीन सुरू असणार त्यामध्ये सर्पदंश, हृदय विकार, विषबाधा अशा पध्दतीचेे तात्काळ मेडीसन विभाग सुरू राहणार आहे.

रूग्णांवर उपचार व तपासणी झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली शासकीय नॉनकोविड रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे. नागरीकांनी घाबरून न जाता कोविडचे नियम पाळणे जरूरीचे आहे. तसेच लसीकरण हे महत्वाचे असल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

Leave a Comment