राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कारही दिले जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन 2018 व 2019 या दोन वर्षांच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली.

यात 2018 साला करिता शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने यांना मिळाला. तर 2019 या साला करिता बारामती तालुक्यातील पिंपरी येथील राजेंद्र दिनकरराव पवार व नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव येथील श्रीमती सुनंदा संतोष रावजी सालोडकर यांना जाहीर झाल्याची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली. या बैठकीला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी विस्तार संचालक विकास पाटील उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’ कृषी शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ पुरस्कार नव्याने सुरू करण्यात आल्याचं सांगून आता पुरस्कारांची संख्या 63 ऐवजी 99 इतकी असल्याचे पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

आर्थिक कृषी हवामान परिस्थिती अडचणीची असून देखील त्यांनी शेतकरी आपल्या परीनं नवीन प्रयोग व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असे काम करीत आहेत. या शेतकऱ्यांच्या बाबत कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावे या कामी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर तालुक्यातील प्रस्ताव तयार करण्याची विशेष जबाबदारी देणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment