विलीनीकरणाशिवाय स्टेअरिंग हातात घेणार नाही; औरंगाबादेतील एसटी कर्मचारी संपावर ठाम

औरंगाबाद – आमचा लढा शासनात विलीनीकरणाचा आहे, मंत्री महोदयांनी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. विलीनीकरण प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

सिडको, चिकलठाणा वर्कशॉप आणि मध्यवर्ती बसस्थानकात एसीटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करत आहेत. काल संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला अमान्य असल्याची भूमिका आंदोलकांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी, सामान्य जनता यांचे हाल होत आहेत त्याबद्दल आमची सहानभूती आहे.

विलीनीकरणाचा फायदा आमच्यासोबत सामान्य जनतेला सुद्धा होणार आहे. पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

You might also like