सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते; नवाब मलिकांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला 1 वर्ष होऊन गेले आहे तरीही सुशांतचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या होती हे सीबीआयने स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही, असे मलिक म्हणाले.

बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतप्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान यापूर्वी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला होता. सुशांत सिंग रजपूत प्रकरणी सीबीआय अजूनही मुद्दाम मौन बाळगून आहे, त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? असा सवाल सचिन सावंत यांनी केला होता.

Leave a Comment