प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर झाला प्रदर्शित; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची गेले अनेक दिवस जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच ६ जून २०२१ शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये राजे रुबाबत चालत येऊन सिंहासनावर आसनस्थ होताना दिसत आहे. शिवराज्याभिषेकाच्या पवित्रदिनी महाराजांचे सिंहासनाधिश्वर असे दर्शन प्रेक्षकांना घडण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे.

https://www.facebook.com/100000338537393/videos/4259354254085817/

 

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर टीझर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले कि, “सरसेनापती हंबीरराव” हा केवळ एक चित्रपट नाही , तर आपल्या दोन्ही छत्रपतींशी निगडीत एक पवित्र भावना आहे.. असे कितीही लॅाकडाऊन आले तरी ही भावना व्यक्त होणार चित्रपटगृहातच.. लवकरच.. पण त्या आधी आजच्या या पवित्र पावन दिवशी तुमच्या आमच्या महाराजांचे हे सिंहासनाधिश्वर दर्शन! यापूर्वी शिवजयंती २०२०चे औचित्य साधत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तर शिवजयंती २०२१च्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार ह्या गौप्याचा उलघडा करण्यात आला होता. आता शिवराज्याभिषेक दिनी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/CPxIO9aJO96/?utm_source=ig_web_copy_link

या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन एल एल पी हे करत असून शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर प्रविण तरडे यांनी संपूर्ण चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाचे सुत्र जबाबदारीनिशी आपल्या खांद्यावर सांभाळले आहे. ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ या लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपटांनंतर प्रविण तरडे हा ऐतिहासिक आणि रुपेरी इतिहासाचे दर्शन घडविणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. पूर्वीच्या चित्रपटांचे यश पाहता ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाकडूनही अधिक अपेक्षा आहेत. त्यामुळे हा चित्रपट किती अपेक्षापूर्ती करणारा राहतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Leave a Comment