शहरातील तापमानाने गाठला उच्चांक 

औरंगाबाद – शहरात उन्हाचा पारा वाढत असून चिकलठाणा वेधशाळेत काल 40.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे.

यापूर्वी इतके तापमान 17 आणि 18 एप्रिल 2020 रोजी नोंदले गेले होते. शहरात गेली तीन दिवस तापमानाचा पारा 40.6 अंश सेल्सिअस वर राहिला. काल तापमानात आणखी वाढ झाली.

आगामी सहा दिवसात तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.