कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
किल्ले वसंतगडावरील श्री चंद्रसेन महाराज मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री राम लक्ष्मण सीतामाई मंदिर या मंदिरांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने व युवा नेते सारंग पाटील यांच्या प्रयत्नातून ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
वसंतगडचे ज्येष्ठ नेते रघुनाथ नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदींनी सहकार्य केले. ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर वसंतगड येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केले.
सरपंच अमित नलवडे म्हणाले, “श्री चंद्रसेन महाराज मंदिर व इतर मंदिरांना ‘क’ वर्ग यात्रा स्थळाचा पर्यटन दर्जा प्राप्त झाल्यामुळे शासनस्तरावर पुढील सोयीसुविधा व निधीसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनस्तरावर प्रयत्न करणे सोपे होणार आहे.”