सातारा | मी नाही, मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. त्यामुळे त्यावेळचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना मुस्काडले पाहिजे असं गंभीर विधान खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, भविष्य काळात ही माकडं आहेत ना सो कॉल्ड पुढऱ्यांनी, आमदारांनी यातून बोध घ्यावा. साताऱ्याच आणि स्टेडियमच वाटुळ करून टाकलंय. त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी याच उत्तर द्यावं. प्रत्येकवेळी मी नाही मि काय केलंय. मुसकडलं पाहिजें यांना ऐन मोक्या वरची जागा वाया घालवली.
जगात सगळीकडे फिरलो असं स्टेडियम पाहिलं नाही. स्पेनचा राष्ट्रीय खेळ आहे बुल फायटर सारखी स्पर्धा घडवली पाहिजे. बुल फायटरमध्ये वापरतात तो पडता द्या माझ्याकडे आणि बुलच्या ऐवजी ज्यांनी वाटोळं केल त्या पुढऱ्यांना तिथं सोडा. त्यामुळे स्पोर्टला वाव मिळेल अशी खिल्ली छ. उदयनराजे यांनी उडवली.