सत्ताधाऱ्यांविना मनपाचा तिसरा अर्थसंकल्प आज होणार सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविना आज सलग तिसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तिन्ही अर्थसंकल्प सादर करण्याचा मान प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना मिळत आहे. प्रशासक अस्तिक कुमार पांडेय आज दुपारी साडेतीन वाजता प्रशासकीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक वॉर्डाला एक कोटी रुपये विकास कामांसाठी देण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. डिसेंबर 2019 मध्ये पांडेय यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर अवघ्या चार महिन्यानंतर एप्रिल 2020 मध्ये त्यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवली. कोरोनाच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेत यांनी दोन अर्थसंकल्प सादर केले.

यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेवरून पांडेय यांनी प्रत्येक वर्गासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामांचा अर्थसंकल्पात समावेश केला. माजी नगरसेवकांना विकास कामांची यादी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Leave a Comment