आता लवकरच लाँच होणार Bharat Bond ETF चा तिसरा टप्पा, तुम्ही गुंतवणूक कधी करू शकाल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारी कंपन्यांच्या बॉण्ड्समध्ये (Government Bonds) गुंतवणुकीची सुविधा देणारा Debt Exchange Traded Fund हा भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा लवकरच लाँच होणार आहे. Greenshoe Option देखील ईटीएफच्या इश्‍यू शी संबंधित असेल. याद्वारे सरकारी कंपन्या (PSUs) फंड उभारू शकतात. भारत बाँड ईटीएफ डिसेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात लाँच होईल असे सांगितले जात आहे.

तिसरा टप्प्याची मॅच्युरिटी कधी होईल?
भारत बाँड ईटीएफ अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इनवेस्‍टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) आणले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा 3 डिसेंबर रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. या ईटीएफच्या तिसऱ्या टप्प्याचा मॅच्युरिटी कालावधी एप्रिल 2032 मध्ये असू शकतो.

दोन टप्प्यात किती रक्कम जमा झाली?
गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देणारा भारत बाँड ईटीएफचा पहिला टप्पा जानेवारी 2020 मध्ये लाँच करण्यात आला. याद्वारे सरकारी कंपन्यांनी 12,400 कोटी रुपये (Fund Raising) उभारले. त्याचा दुसरा टप्पा जुलै 2020 मध्ये लॉन्च करण्यात आला. या टप्प्यात सरकारी कंपन्यांनी 15,000 कोटी रुपये उभे केले होते.

आता किती भारत बाँड ईटीएफ आहेत?
सध्या 4 भारत बाँड ईटीएफ आहेत. यापैकी एकाची मॅच्युरिटी एप्रिल 2023 आहे. त्याच वेळी, दुसरा एप्रिल 2025 मध्ये मॅच्युर होईल, तर तिसरा एप्रिल 2030 आणि एप्रिल 2031 मध्ये मॅच्युर होईल. हे ETF 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत गुंतवणूकदारांच्या 36,359 कोटी रुपयांचे मॅनेजमेंट करत होते. भारत बाँड ईटीएफ नंतर, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये पॅसिवली मॅनेज्ड फंड्सचा पूर येऊ शकतो. SEBI ला सुमारे 11 पॅसिवली मॅनेज्ड डेट स्कीम लागू करण्यात आल्या आहेत. अशा अनेक स्कीम आधीच सुरू आहेत.

Leave a Comment