हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमान येथील समुद्रात सांगली जिल्ह्यातील तिघे जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. समुद्रकिनारी एन्जॉय करताना समुद्राच्या लाटेचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील लोकांवर ही परिस्थिती ओढवली. रविवारी ही दुर्घटना घडली असून याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.
वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव शशिकांत म्हमाणे असून ते मूळचे जत येथील आहेत. दुबई येथे कामासाठी स्थायिक असलेले शशिकांत सुट्टीसाठी शेजारच्या ओमान देशात गेले होते. यावेळी समुद्रकिनारी आनंद साजरा करत असतानाच अचानक आलेल्या लाटेत शशिकांत यांच्यासह त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले.
🔴 حادثة غرق العائلة الاسيوية في المغسيل بفعل قوة الأمواج إثر تخطيهم حاجز الأمان ! pic.twitter.com/rDZAETJuik
— طقس عُمان 🌦 (@WeatherOman) July 11, 2022
मुलांना वाचवण्यासाठी शशिकांत म्हमाणे यांनी समुद्रामध्ये उडी घेतली मात्र समुद्राच्या लाटा एवढ्या प्रचंड होत्या की यांच्यासह दोन्ही मुले हे खोल समुद्रामध्ये ओढले गेले. या दुर्घटनेनंतर त्यांचे बंधू राजकुमार म्हमाणे हे ताबडतोब दुबईला गेले आहेत.