तीन महिन्याच्या चिमुकलीचे बापानेच केले अपहरण

औरंगाबाद : भांडण झाल्यामुळे आईसोबत माहेरी निघालेल्या पत्नीला मारहाण करून तीन महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

हाती आलेल्या माहितीनुसार डोंगरगण अहमदनगर या ठिकाणी वस्तीस असणाऱ्या अपर्णा गाडेकर या महिलेने दोन वर्षांपूर्वी गावातील संदीप दिलीप कदम यांच्या सोबत प्रेम विवाह केला होता. दोघांचा संसार सुरु असताना संदीप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा निघाला त्याने पत्नी अपर्णा छळ सुरू केला. तीन महिन्यापूर्वी म्हणजे 27 मे रोजी त्यांना एक अपत्य झाले. मुलगा झाल्याचे कळताच आनंदित झालेल्या संदीप ने दोन महिन्यापूर्वी पत्नी अपर्णा व बाळाला सोबत घेऊन वाळूज एमआयडीसी गाठले आणि रोजगाराच्या शोधात फिरू लागला. परंतु काही दिवसांनी संदीपने पुन्हा पत्नीला मारहाण करून त्रास दिल्याची घटना घडली. यामुळे अपर्णाच्या आईने संदीप ला समजावले परंतु त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली यामुळे अपर्णा हिने आई सोबत माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या संदीप ने दोघेहि बसलेल्या असलेल्या रिक्षा चा पाठलाग करून रांजणगाव फाट्याजवळ रिक्षा अडवली आणि 3 महिन्याच्या चिमुकल्या मुलाला हिसकावून तो पळून गेला.

यानंतर हतबल झालेल्या अपर्णाने आई सोबत एमायडीसी वाळूज पोलीस स्टेशन गाठून घडलेली घटना सांगितली. याप्रकरणी सर्व माहिती बंदोबस्तासाठी शहरात गेलेल्या पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना समजताच त्यांनी तात्काळ संदीपचा शोध घेण्यास हालचाल सुरू केली. याचबरोबर उपनिरीक्षक निर्वळ यांनी अपर्णा व तिची आई सुजाता यांच्यासोबत सहकाऱ्यांच्या मदतीने भरपावसात वाळूज परिसरात शोध घेतला, याच दरम्यान संदीपने फोनवर बाळ दूध पितानाचे फोटो पाठवून फोन बंद केल्याचे समोर आले.

You might also like