हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 173 गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात पाच जण पुणे जिल्ह्यातील आहेत. डॉक्टरांनी गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधित रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत, आणि प्रशासन यावर विशेष लक्ष देत आहे. या सोबतच प्रशासनाने लोकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
173 रुग्णांपैकी 72 जण बरे –
दूषित आहारामुळे जीबीएसचे रुग्ण वाढले आहेत, पण 173 रुग्णांपैकी 72 जण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच आता 55 रुग्ण आयसीयू मध्ये आणि 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. इतर जीबीएसबाधित रुग्णांची स्थिती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना सुरू केली आहेत. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि लवकरात लवकर उपचार घेण्याचे सुचवले आहे.
नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी –
वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेण्याची आणि परस्पर औषधोपचार टाळण्याचीही सुचना केली आहे. नागरिकांना पाणी पिण्याआधी उकळून गाळून प्यावे असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे जंतू पोटात जातात, ज्यामुळे शरीरातील पेशींचा हल्ला होतो.
नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
आपण राहतो तो आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
शुद्ध , स्वच्छ पाणी प्या .
ताजे आणि वातावरणानुसार योग्य अन्न खावे .
उघड्यावरचे अन्न व पेय टाळावे.