औरंगाबाद | सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गावरील औट्रम घाटातील बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली गडकरींना शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
ओट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून याबाबत तयारी करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल असे संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे. यापूर्वी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीय दळणवळण विभागाचे सचिव तथा राष्ट्रीय महामार्गाचे प्रभारी अध्यक्ष गिरीधर माने यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बोगद्याच्या कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याने हे काम रद्द करण्यात आले, अशी माहिती पसरवण्यात आले. यामुळे गैरसमज निर्माण होत असून हे काम पूर्ण केल्यास मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरेल असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, ऍड आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, सरपंच अशोक पाटील हे उपस्थित होते.