औरंगाबाद | मला गुप्तधन सापडले आहे ते सोने स्वस्त दरात द्यायचे आहे असे आमिष दाखवून औरंगाबाद येथील लोकांना सारोळा कासार तालुका नगर येथे लुटले. नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी संदीप धागे याच्यासह अनोळखी व्यक्ती व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंग कानाजी काशी देवळे, वय 36 ( रा. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर हल्ली रा. उस्मानपुरा औरंगाबाद) स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले. काशीदे भावासह सोने खरेदी करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सारोळा कासार येथे आहे.
काशीदे निर्जन स्थळी आले तेव्हा दबा धरून बसलेले आरोपी यांनी त्यांच्यावर जोरजोरात दगड मारण्यास सुरुवात केली. काशीद बंधू कडील रोख रक्कम, मोबाईल, घड्याळ ,असा 8 लाख 34 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. दुसऱ्या दिवशी काशीद यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप ढाकणे यांच्यासह आठ ते दहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.