मधमाशांच्या हल्ला जिवावर बेतला; दरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा तालुक्यातील शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे.  यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना एक युवक दरीमध्ये कोसळण्याची दुर्घटना घडली. यामध्ये या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमेश्वर विलास कदम वय 13 मु.पो. तारळे असे सदर मृत मुलाचे नाव आहे.

शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त भाविक दर्शनासाठी डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिरात गेले होते. यावेळी झाडावरील मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने एकच तारांबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे धावू लागले. यावेळी धावत असतानाच मृत सोमेश्वर कदम दरीत कोसळला.

बचाव कार्य करून या युवकाला दरीतून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे-

1) गौरव लावंघरे (16)

2)जय लावंघरे (14)

3) तानाजी धनवडे (72)

4) स्वरुप धनवडे(19)

5)प्रणय धनवडे (24)

6) संदेश धनवडे (22)

7) राजेश पवार (45)

8)शुभम धनवडे (24)

9)गणेश बाकले (25)

10) ऋषी धनवडे (25

Leave a Comment