पाणी भरण्यासाठी विरीरीवर गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतातील विहिरीवर पाणी भरताना चिमुकली पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील विटेकरवाडीत घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविता राजू विटेकर व 9 वर्षीय चिमुकली श्रद्धा राजू विटेकर अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी नऊ वाजता घरातील स्वयंपाक करून दोन्ही माय-लेकीं त्यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान नऊ वर्षीय श्रद्धाचे पाय घसरल्याने ती चिमुकली विहिरीत पाण्यात पडली. बाजूलाच असलेल्या आईने क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही माय-लेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घरच्यांना माहिती होताच त्यांनी ही याबाबत पोलिसांना माहिती दिली.

फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी पथकासह धाव घेत विहिरीतील माय-लेकिना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटने प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment