मका फॅक्टरीत काम करताना हात तुटलेल्या कर्मचाऱ्याला 45 लाखांची मदत देण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली शहरातील अहिल्यानगर मध्ये असणाऱ्या संजय इंडस्ट्रियल इस्टेट येथील स्मिता इंटरप्रायझेस या मका फॅक्टरी काम करत असताना एका कर्मचाऱ्याचा हात मशीन मध्ये अडकून तो तुटला. सदरची घटना हि १० मार्च रोजी घडली. जामुद्दिन आलम असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

फॅक्टरीच्या मालकांनी त्या कर्मचाऱ्याला तुटपुंजी मदत देऊन बाहेर पाठविले. यानंतर आता संघर्ष सफाई कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून आलम याला ४५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले आहे. अहिल्यानगर येथील एमआयडीसी मध्ये स्मिता इंटरप्रायझेस नावाची मक्याची फॅक्टरी आहे. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जामुद्दिन आलम हा कर्मचारी काम करत होता.

१० मार्च रोजी जामुद्दिन आलम हा मशनरीवर काम करत असताना त्याचा उजवा हात मशीन मध्ये सापडून तुटला. सदरची घटना घडल्यानंतर मालक राजकीय ताकद वापरून त्याला तुटपुंजी मदत करून बाहेरगावी घालवत आहेत. सदरची माहिती संघर्षसफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेत सहाय्यक कामगार आयुक्तांना न्याय देण्याची विनंती केली.

Leave a Comment