साताऱ्यातील ग्रामस्थांची अनोखी भूतदया ; अडचणीतील निलगायीची केली सुखरुप सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. अनेकदा तर अडचणीत असलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे बहाद्दरही आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्हातील वाळंजवाडी जंगलात पाहायला मिळाली.

या ठिकाणी दोन वर्षांची नीलगाय कुत्र्यांच्या तावडीत सापडली. स्वतःच्या बचावासाठी ती गाय वाळंजवाडी गावात शिरली. गावातून पळून जात असताना ती गावच्या शिवकालीन तळ्यात पडली. यावेळी गायीचा आक्रोश ऐकून गावातील ग्रामस्थ तळ्याकाठी जमले आणि या गायीला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर गाईला सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे.

ही घटना घडल्यानंतर गावातील लोकांनी मेढा वनक्षेत्रपाल तुकडी, शिवरक्षक व महाबळेश्वर ट्रेकर्स याना फोन केला होता, परंतू त्यांना यायला वेळ लागणार असल्याने गावातील धाडशी कार्यकर्त्यांनी पाण्यात उडया टाकून गाईला वाचवले. या कामी वाळंजवाडी ग्रामस्थ, मेढा वनक्षेत्राचे, परधाने वनपाल, परदेशी वनपाल, मर्ढेकर फाँरेस्ट यानी सहकार्य केले.

Leave a Comment