उंब्रजला सर्विस रोडवर ताबा सुटून गाडी पलटी; चालक सुखरूप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उंब्रज येथे तारळे नदी परिसरातील वळणावरती चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी महामार्गावरून सर्विस रस्त्यावर पलटी झाली. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली. सुद्यवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंब्रज येथे महामार्गावर तारले नदी पत्रावरून गेलेल्या रस्त्यावर तीव्र असे धोकादायक वळण आहे. या ठिकाणी अनेकवेळा अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहरेत. दरम्यान आज सकाळी धोकादायक वळणाच्या पुढील अंतरावरून महामार्गावरून जात असलेली चारचाकी गाडी (क्र. एमएच 10 बीए 7227) पलटी झाल्याचे घटना घडली.

चारचाकी गाडीचा वेग अधिक असल्याने गाडी भरधाव वेगाने महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेले संरक्षक रेलिंग तोडून सर्विस रस्त्यावर जाऊन पलटी झाली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले व महामार्ग पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी महामार्गाच्या कडेला पलटी झालेल्या गाडीला क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले.