औरंगाबाद प्रतिनिधी |पुढील सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वड सावित्री पौर्णिमेला महिला पूजा करतात परंतु काही पत्नी पीडित पुरुषांनी ही पत्नी नको रे बाबा असे म्हणत वटसावित्रीच्या एक दिवस आगोदर पिंपळाची पूजा करून साकडे घातले औरंगाबाद शहरातील पत्नीपीडित पुरुष संघटनेच्या आश्रमात करण्यात आली
दिवसदिवस पुरुषांवर अत्याचार वाढत चालले आहे त्यामुळे अनेक पुरुषावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे पुरुष आत्महत्या आणि वाढता व्याभिचार यामुळे आपली संस्कृती लोप पावत चालली असून विवाह पद्धत धोक्यात आली आहे तसेच स्त्री आणि पुरुष असा भेदभाव होऊ नये असे एकीकडे बोलले जात आहे मात्र दुसरीकडे सर्व कायदे स्त्रियांच्या बाजूने बनविले आहेत त्याचा काही महिला दुरुपयोग करून पुरुषांवर अत्याचार करतात तसेच नवरा विरोधात न्यायालयात जाऊन केस करतात त्या महिलादेखील वटसावित्री पौर्णिमा फेरे मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून उठाठेव करतात त्यामुळे अशा अत्याचार करणाऱ्या पत्नीपासून सुटका मिळावी यासाठी पुरुषांच्या न्याय हक्कासाठी लढणारी पत्नीपीडित पुरुष संघटनेच्यावतीने वटसावित्री पौर्णिमेच्या एक दिवस आगोदर ही पत्नी नको रे बाबा असे म्हणत पिंपळाच्या झाडाची पूजा केली या संघटनेकडून अशी मागणी करण्यात येत आहेत की पुरुषासाठी विशेष कायदा तयार करण्यात यावा या वेळी भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, विशाल नंदारकर, ऍड दासोपंत दहिफळे पांडुरंग गांडूळे आदी पत्नी पीडितांची उपस्थिती होती.