काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्रातून लखनौला जात होते
देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना आणि इतरांना अन्य राज्यांतून त्यांच्या घरी नेण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी काही खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, एका व्हिडिओमध्ये काही लोकं ही कॉंक्रिट मिक्सरच्या ट्रकच्या टाकीमधून बाहेर पडताना दिसले तेव्हा सोशल मीडियावर अनेक जण आश्चर्यचकित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूरचा आहे.इथे एका छोट्या मार्गाने लोक ट्रकमधून कसे बाहेर पडत आहेत हे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते.

काँक्रीट मिक्सर ट्रकच्या मिक्सर टँकमध्ये १८ लोक लपलेले होते
असे सांगितले जात आहे की महाराष्ट्रातून काही मजूर पोलिसांपासून लपून त्यांच्या घरी जात होते पण त्यांना वाटेतच पकडण्यात आले. डीएसपी उमाकांत चौधरी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोलिसांना महाराष्ट्रातून लखनौला जाणाऱ्या एका कॉंक्रिट मिक्सर ट्रकच्या मिक्सर टँकमध्ये १८ जण प्रवास करत असलेले आढळले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे आणि एफआयआर नोंदविण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांचे सुभेदार अमित कुमार यादव यांनी सांगितले की, नियमित तपासणी दरम्यान इंदूर शहरापासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या पंथ पिपलाई या गावात हा ट्रक थांबविण्यात आला.

तेथे १४ कामगार आणि ४ ट्रक मालकाचे कर्मचारी होते
ते पुढे म्हणाले की, जेव्हा शंका आली तेव्हा आम्हीया कॉंक्रिट मिक्सर ट्रकची तपासणी केली आणि उघड्या झाकणातून आत डोकावले तेव्हा आतमध्ये १८ लोकांना पाहून आमचे डोळे विस्फारले गेले.या ट्रकमध्ये १४ प्रवासी मजूर आणि ४ ट्रक मालकाचे कर्मचारी लपून युपीकडे जात होते. अमितकुमार यांच्या मते, हे कामगार उत्तर प्रदेशचे असून लॉकडाउनमुळे ते महाराष्ट्रातून घरी परतत होते.

 

घरी पाठविण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येते आहे
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील कारखाने बंद झाल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असे कामगारांनी सांगितले. त्यामुळे त्यांना काहीही करून लखनौ गाठायचे होते. वाहतूक पोलिस सुभेदार पुढे म्हणाले की,त्यांच्या चौकशीदरम्यान हे सर्वजण शुक्रवारीच महाराष्ट्र सोडून आले असल्याचे आढळले. सध्या या सर्वांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले असून डॉक्टरांना बोलावून त्यांची प्रकृती तपासली जात आहे. मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचीही व्यवस्था केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment