औरंगाबाद : आजपर्यंत विवाह सोहळ्यांचे अनेक विद्वानांनी पौरोहित्य केले परंतु अपवाद औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील विवाह सोहळ्याचे रविवारी पैठणमधील प्रसिद्ध पुरोहित वेदमूर्ती यज्ञ सम्राट कमलाकरगुरु शिवपुरी यांचे चिरंजीव रुपेश यांचा विवाह होता. भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्योतंर्लिग वारानसीतील काशी विश्वनाथ श्री पाणीनी महिला वेद विद्यापिठातील यज्ञ दत्त आर्य यांच्या बहीण देविका आर्य समाज यांच्या विवाह सोहळ्यांचे धार्मिक पौरोहित्यसह कन्यादान, सप्तपदी पुजन धार्मिक वेदोक्त पध्दतीने विधिवत पूजन झाले. महिलेने पौरोहित्य केल्याने परीसरात सर्वत्र चर्चा केली जात आहे.
सर्व विधी येथील पंडित दत्तागुरू पोहेकर यज्ञ सम्राट कमलाकरगुरु शिवपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानाप्रार्य पंडित डॉ . प्रितीविमनषीनी कु.अंजली राजावत कुठे, मोना घुमरे, दामिनी रॉय, दिव्यकिरण आर्या, आचार्य नंदिता, शाश्री पंडित राकेश तिवारी, पंडित यज्ञदत्त, आर्य संतोष यांच्या वेदमंत्र घोषात धार्मिक विधी पार पडले.
या सोहळ्याकरिता पंडित प्रमोद गुरु जोशी, पंडित सतिश शाश्री वागेश्वरी, पंडित अनंत खरेभट, देवेंद्र शिवपुरी, विशाल दाणी, समीर शुक्ल, कैलास देशमुख, प्रमोद पाठक, रोहन भुसारे ,महेश शिवपुरी, योगेश शिवपुरी, हरेश शिवा, अनंत शे़वतेकर, विजय चाटूपळे, सूर्यकांत शिवपुरी यांनी सहकार्य केले.