नवऱ्याला वाचवायला जाऊन बायकोचा जागीच मृत्यू

जालना |  विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या पतीला अचानक शॉक लागल्याने पत्नी पतीला वाचविण्यासाठी गेली मात्र या घटनेत पत्नीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना भोकरदन ता. तळणी येथे घडली आहे.

सुनिता बाबासाहेब वळेकर (50) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी घरात पिण्यासाठी पाणी नव्हते म्हणून बाबासाहेब वळेकर हे घराजवळील विहीरीवर विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला हा प्रकार सुनिता वळेकर यांना समजल्यावर त्यांनी लगेच पतीला वाचविण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनाही विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पती बाबासाहेब वळेकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना भोकरदन शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुनिता यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले. तेव्हा त्यांना शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You might also like