4300 कोटींच्या घोटाळ्यात सामील असलेल्या ‘या’ व्यक्तीच्या पत्नीने 9 महिन्यांच्या मुलाला दिले 40 कोटी रुपयांचे गिफ्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू राणा कपूर यांनी त्यांचा 9 महिन्यांचा नातू आशिव खन्नाला 40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी गिफ्ट केली आहे. ही प्रॉपर्टी दिल्लीच्या पॉश जोरबाग परिसरात आहे. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार, Zapkey.com द्वारे दिलेल्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स द्वारे हे उघड झाले आहे.

Zapkey.com द्वारे दिलेल्या डॉक्युमेंट्स नुसार, प्रॉपर्टी 31 जुलै 2021 रोजी रजिस्टर केली गेली आहे. हे गिफ्ट डीड म्हणून रजिस्टर्ड आहे. यासाठी राणा कपूरच्या पत्नीने 36.90 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. हे गिफ्ट डीड आशिव खन्ना यांच्या आई राधा कपूर खन्ना यांच्यामार्फत 36.90 लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्कासह आशिव खन्ना यांच्या बाजूने भरले गेले आहे.

369 चौरस मीटरचा फ्लॅट
गिफ्टमध्ये दिलेली ही प्रॉपर्टी दक्षिण दिल्लीच्या जोरबाग भागात आहे. तळमजल्यावर 2 BHK फ्लॅट देखील आहे. याशिवाय येथे पार्किंग स्लॉट आणि इतर काही सुविधाही आहेत. फ्लॅटचे क्षेत्रफळ 369 चौरस मीटर आहे. प्रॉपर्टीचे अंदाजे बाजार मूल्य सुमारे 40-44 कोटी रुपये आहे. Zapkey.com ने दिलेल्या डॉक्युमेंट्स नुसार, याच क्षेत्रातील आणखी एक प्रॉपर्टी या वर्षी 24 जुलै रोजी 43.5 कोटी रुपयांना विकली गेली. 2004 मध्ये राणा कपूरच्या पत्नीला तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा मिळाल्याची माहिती डॉक्युमेंट्स द्वारे समोर आली.

राणा कपूरवर 4,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे
कायदेतज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट डीड म्हणून काहीही देऊ शकता. प्रॉपर्टीच्या बाबतीत, ती ट्रांसफर करणे आवश्यक आहे. 1 जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) न्यायालयाने राणा कपूरचा जामीन फेटाळला होता. राणा कपूरवर येस बँकेद्वारे 4,300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Leave a Comment