औरंगाबाद | चिकलठाणा परिसरातील वडिलोपार्जित शेतीसाठी पत्नीने पतीच्या अपहरणाचा बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. वडिलोपार्जित शेतीतील अर्धा एकर शेती मिळवण्यासाठी पत्नीनेच अपहरणाचा डाव रचल्याचे सांगण्यात आले आहे. शेतामध्ये दुचाकीची चावी फेकून काही आंतरावर चपला फेकून दिल्या आणि मारहाणीमध्ये मोबाईल फुटल्याचे सांगण्यासाठी तो काही अंतरावर ठेवला. आणि लगेच पोलीस स्टेशन गाठत पतीचे काका, भाऊ आणि त्यांच्या मुलांनी अपहरण झाल्याची तक्रार दिली. पण चिकलठाणा पोलिसांनी 12 तासात हा बनाव खोटा असल्याचे सांगितले आहे.
चिकलठाण्यातील एका कंपनीत काम करणारा गोरख पळसकर आणि त्यांची पत्नी अनिता हे अयोध्यानगर या ठिकाणी राहतात. काही दिवसांपूर्वी गोरख आणि त्यांचे चुलते सुखदेव पळसकर यांच्यासोबत वाद झाला होता. त्यांनी अजब तोडगा काढला आहे. 28 मे रोजी अनिता सकाळी दहा दहा वाजता पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासमोर पोहोचल्या होत्या. सुखदेव पळसकर आणि त्यांची मुले मुरलीधर, रमेश, अंकुश यांनी माझ्या पतीचे अपहरण केले आहे. त्यांना वाचवा म्हणत तिने टाहो फोडला. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत चौघांना ठाण्यात आणले प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी केली असता शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे अनिता यांचा घटनाक्रम सतत विचारला असता त्यामध्ये तफावत आढळून आली. आणि हा सर्व बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
वाघलगाव (तालुका फुलंब्री) येथे नातेवाईकांच्या घरी लपलेल्या गोरखला ताब्यात घेण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, पाटील यांच्या सोबतच उपनिरीक्षक प्रदीप दुबे, अजितनाथ शेकडे, रवींद्र साळवे, सोपान डकले, दीपक देशमुख, अण्णा गावंडे, दीपक सुरासे यांनी ही कारवाई केली.
अर्धा एकर जमीन सुखदेव यांच्याकडे जात असल्याचे लक्षात आल्यावर अनिताला त्याला अपहरणाची कल्पना सुचली अपहरण झाले. आणि याची खात्री पोलिसांना पटावी म्हणून गोरखने शेतात पोहोचल्यावर पत्नीला कॉल केला. थाप लागल्याचे नाटक करून मला मारहाण करत आहेत मला कुठेतरी नेत आहेत मला वाचवा असे म्हणत कॉल कट केला. ठरल्याप्रमाणे तिने तो कॉल रेकॉर्ड केल्या पोलिसांनाही दिला दरम्यान खोटी तक्रार दिल्याबद्दल न्यायालयीन प्रक्रिया करून अनिता गोरख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.