कामकाज पत्रिकेवर 12 बील कशी? सदस्यांनी बील वाचायची नाहीत का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला गेला. दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटी व वीज कनेक्शनवरून त्यासंदर्भात जी नोटीस दिली आहे ती मांडण्याची परवानगी तसेच 12 बिलांच्याबाबत विरोधकांना माहिती नसल्याने त्याबाबत माहिती देण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके आणि अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनास सुरुवात होताच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची मागणी केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, बीएस्सी मध्ये असा निर्णय झाला होता की, पहिल्या दिवशी केवळ आपण शोक प्रस्ताव घेतो. मात्र, गेली अनेक अधिवेशनापासून कामकाज होत नाही, प्रश्नोत्तर होत नाही म्हणून मी आग्रह केला. की, प्रश्नोत्तर व लक्षवेधी झाल्या पाहिजेत. पण आज कामकाज पत्रिकेवर नवीन 12 बिले विचारार्थ दाखवण्यात आलेली आहेत. ती ठेवण्यात आलेली आहेत. आम्हाला त्याची माहिती हवी आहे. ती महत्वाची असून त्याची पूर्ण माहिती आम्हाला द्यावी. शोक प्रस्तावही घ्यावेत, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे फडणवीस यांनी म्हणाले.

 

फडणवीसांनी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जी विरोधीपक्षनेत्यांनी मुद्दे उपस्थित केली तीच सरकारची भूमिका आहे. आज कामकाज पत्रिकेत जे काही आहे. ते सर्व कामकाज त्याठिकाणी घ्यावे. 11 मध्ये शासकीय विधेयक आहेत तीच घ्यावी त्यानंतर शोकप्रस्ताव घ्यावेत. हि गोष्ट सरकारला मान्य असल्याचे पवार यांनी म्हंटले.