Sunday, May 28, 2023

विवाहबाह्य संबंधात बाधा येऊ नये आणि गुपित शाबूत राहावे म्हणून महिलेने प्रियकरासोबत तरुणाचा केला निर्घुण खून!

नांदेड | विवाहबाह्य संबंध हे एका नात्यासाठी कर्दनकाळ ठरतात. यातून अनेक गुन्हे घडत असतात. असाच एक गुन्हा नांदेडमध्ये घडली आहे. विवाहबाह्य संबंध उघड करण्याची धमकी एका तरुणाने एका महिलेला दिली होती. आपले प्रेम प्रकरण उघडे पडेल या भीतीने महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तरुणाचा निर्घुण खून केल्याच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

देगलूर तालुक्यातील कुडली या गावचा जगदीश पुंडलिक हा 21 वर्षीय तरुण रहिवाशी होता. 1 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. मारखेल पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 25 फेब्रुवारीला पोलिसांना परिसरात डोक्याची कवटी दिसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आसपासचा परिसर पाहिल्यानंतर शेजारच्या शेतात गवतामध्ये इतर अवयव सापडले. त्यानंतर पोलिसांनी जगदीशच्या वडिलांना बोलवून घेतले. कपड्यावरून जगदीशच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हेगारांचा शोध सुरू झाला.

जगदीश याची शेजारी असलेली अनुसया गोंदे यांचे त्याच गावात राहणाऱ्या शुभम चीलमपाढे या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे जगदिशला समजले होते. याबाबत वाच्यता करण्याचे दोघांना त्याने कळवले. यामुळे दोघे घाबरले. त्यानंतर मध्यरात्री शिवारात त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून परिसरात फेकून दिले. पोलिसांनी आरोपीवर भादंस कलम 302, 301, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.