आपल्या पाळीव कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून महिलेने 1 वर्षात कमावले लाखो रुपये

0
94
Social Media
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरा विचार की सोशल मीडियावर फक्त फोटो टाकण्यासाठी आपल्याला कोणी पैसे दिले तर… मात्र आता तुम्ही म्हणाला कि त्यात नवीन काय आहे हे तर आधीपासूनच सुरु आहे. अनेक सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया इंफ्लूएंसर्स फोटोज किंवा पेड पार्टनरशिपचे फोटोज पोस्ट करतात आणि पैसे कमावतात. पण कधी तुमच्या असे ऐकण्यात आले आहे की एखादी व्यक्ती फक्त आपल्या पाळीव कुत्र्यांचे फोटो पोस्ट करून लाखो रुपये कमवू शकते. होय… असे नक्कीच घडले आहे. नुकतेच अशाच एका महिलेने असे केले. ज्यामुळे लोकं आश्चर्य व्यक्त करत आहेत. Social Media

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनची फोटोग्राफर उर्सुला एटकिन्सन आपल्या 2 पाळीव कुत्र्यांमुळे सोशल मीडियावर खूप फेमस झाली आहे. उर्सुला कडे गोल्डन रिट्रीव्हर जातीची दोन कुत्री आहेत. त्यातील एकाचे एकाचे नाव हक्सले आहे तर दुसऱ्याचे नाव ह्यूगो आहे. उर्सुला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांसोबतचे मस्ती करतानाचे फोटोज नेहमीच शेअर करत असते

https://www.instagram.com/reel/Cch8cKPo9E_/?utm_source=ig_embed&ig_rid=9a9980c8-7e92-40df-a178-0de0d61746e7

एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की उर्सुलाने फक्त गेल्या 1 वर्षातच इंस्टाग्रामवर आपल्या पाळीव कुत्र्यांचे फोटो पोस्ट करून लाखो कमावले. तिची एका वर्षाची कमाई जवळपास 28 लाख रुपये आहे. एप्रिल 2020 मध्ये चॅनल 4 डॉक्युमेंटरीज यूट्यूब व्हिडिओमध्ये बोलताना तिने याबाबतचा खुलासा केला. तेव्हा तिचे 1 लाखांहून जास्त फॉलोअर्स होते मात्र आता तिचे 2.5 लाखांहून जास्त फॉलोअर्स बनले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here