महिला अंघोळीला गेली असताना घरात घुसला चोर; नंतर…

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घरामध्ये असणाऱ्या महिलेवर अज्ञात इसमाने चाकूच्या साहाय्याने वार करत तिला जखमी केले आहे. सौ. चंचल प्रतीक घुलक्षे असे हल्ल्यात जखमी झालेल्या गृहिणीचे नाव आहे . परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनीतील राहत्या घरी सायंकाळी दहा दरम्यान घरामध्ये आंघोळीला गेलेल्या गृहिणीला घरामध्ये कोणीतरी असल्याची चाहूल लागली तिने दार उघडून बघितल्या बरोबर अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला.

झालेल्या झटापटीमध्ये हल्लेखोराचा चाकू तिला लागला. मात्र जोरदार प्रतिकार केला असता हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला . घटनेमध्ये जखमी झालेल्या गृहिणीच्या मनगटावर चाकूच्या जखमा झाल्या आहेत उपचार करत हाताला टाके सुद्धा लागलेेत. घडलेल्या घटनेमुळे गृहिणी पार घाबरून गेली आहे. तर परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले असुन परतवाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला . मात्र तोवर आरोपी पसार झालेला होता. सदर प्रकरणामुळे संपूर्ण परतवाडामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर जर सायंकाळी साडेदहा वाजताच शहरातील महीला नागरिक असुरक्षित आहेत तर मग मध्यरात्रीचे काय असा सवालही सामाजिक कार्यकर्ते विजय पोटे यांनी उपस्थित केलेला आहे

You might also like