औरंगाबाद : जुन्या वादातून दोघांनी महिलेची दुचाकी जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २३ मे रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास पडेगावात येथे घडला.
ज्योती प्रदीप चौधरी (वय ३४, रा. न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळनगर) यांचा पवन भीमराव मोकळे (रा. एन-२, सिडको, रमाबाई आंबेडकरनगर) याच्याशी जुना वाद होता. या वादातून मोकळे, त्याचा नातेवाईक करण बबन कदम व इतर दोघांनी चौधरी यांची दुचाकी (एमएच-२०-एफजे-५९३६) पेटवून देत नुकसान केले.
याप्रकरणी चौधरी यांनी छावणी पोलिसात तक्रारी अर्ज केला होता. त्यावरुन सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.