सरकारी कामातून ‘दलित’ शब्द होणार हद्दपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha’ आणि मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती व नव बौद्ध’ या शब्दाचा वापर करावा असा शासन निर्णय राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला आहे.

भारतीय संविधानाच्या कलम ३४१ अंतर्गत निर्गमत केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशांतर्गत सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये इंग्रजीमधील ‘Scheduled Caste’ व अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये योग्य अनुवादित शब्द वापरावा, अशा सूचना प्राप्त झाल्यावर राज्य शासनाने पुढील निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती व नव बौद्ध’ या शब्दाचा वापर करावा असा शासन निर्णय राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला आहे.