कोरोना काळात भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘हा’ शब्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल ट्रेंड हा लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो, जो लोकांमधील कुतूहल दर्शवितो. गुगलच्या अलीकडील सर्च ट्रेंडने लोकांच्या मूड बाबत खुलासा केला आहे. जूनमध्ये लोकांनी कोरोनाव्हायरसबद्दल विचारले की, ‘कोरोना विषाणू कमकुवत होत आहे का ?’, ‘कोरोनोव्हायरसची लस भारतात कधी येईल?’ आणि ‘कोरोनोव्हायरस कधी संपेल का? या प्रकारच्या माहितीसाठी शोध घेतला. मात्र मे महिन्याच्या तुलनेत हा सर्च बर्‍यापैकी घसरला आहे. जूनमध्ये लोकांनी साइटवर सर्वाधिक बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला सर्च केले.

मेच्या तुलनेत जूनमध्ये घट झाली
मे महिन्याच्या तुलनेत या संसर्गाबद्दल विचारले जाणाऱ्या प्रश्नांमध्ये जूनमध्ये 66% घट नोंदली गेली. गुरुवारी गुगलने अशी माहिती दिली आहे की, जूनमध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूतला भारतातील साइटवर सर्वाधिक सर्च केले गेले होते. त्यानंतर, या लिस्ट मध्ये सूर्यग्रहण 4,550 टक्के वाढीसह दुसर्‍या क्रमांकावर होते.1,050 टक्के वाढीसह तिसर्‍या क्रमांकावर फादर्स डे होता.

या लसीवर केलेल्या सर्चच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतीय नेटीझन्स सध्याच्या परिस्थितीत स्वत: ला अपडेट करीत आहेत, परंतु कोरोना लसीबाबत प्रत्येकाच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. जूनमध्ये अव्वल ट्रेंडिंग मध्ये ‘कोरोनाव्हायरस न्यूज’ 3,450 टक्के आणि ‘कोरोनोव्हायरस लस 1,350 टक्क्यांनी वाढली . देशात संक्रमित लोकांची संख्या ही 6 लाख 25 हजार 544 पर्यंत वाढली आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 18,213 झाली आहे.

मेडिसिनचा सर्च
जूनमध्ये, पतंजलीने कोरोनावर औषध देखील सुरू केले, त्यानंतर “पतंजली कोरोना मेडिसिन”, “ग्लोबल लस समिट” आणि “डेक्सामेथासोन” सारख्या सर्च मध्ये आणखी वाढ झाली. गेल्या महिन्यात कोरोना वर गोव्यात सर्वाधिक सर्च करण्यात आला त्यानंतर दिल्ली आणि चंदीगड या संदर्भात सर्च करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment