लंडन । जगातील सर्वात महागड्या मेंढीचा लिलाव करण्यात आला आहे. या टेक्सल जातीच्या मेंढीला ३ लाख ५० हजार गिनी (४९०,६५१ डॉलर) एवढ्या किंमतीला विकण्यात आलं आहे. भारतीय रुपयांनुसार या मेंढींची किंमत जवळपास साडे ३ कोटी रुपये एवढी आहे. यामेंढीला जगात आत्तापर्यंत एवढी किंमत पहिल्यांदाच मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
टेक्सल जातीची ही मेंढी गुरुवारी लानार्कमध्ये स्कॉटिश नॅशनल टेक्सल सेलमध्ये ३ शेतकऱ्यांनी विकत घेतली. टेक्सल्स ब्रीडची मेंढी जगात अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे साहजिकच या मेंढीची मागणीही जास्त असते. ही मेंढी नेदरलँडच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या टेक्सेलच्या छोट्याश्या बेटावर सापडते. या मेंढीची किंमत ही ५ अंकीच असते, पण अनेकवेळा या मेंढीला त्यापेक्षाही खूप जास्त किंमत मिळते.
टेक्सल ब्रीडची ही मेंढी विकत घेण्यासाठी ७-८ जण बोली लावत होते, त्यामुळे या मेंढीला एवढी जास्त किंमत मिळाली. याआधी २००९ साली मेंढीच्या लिलावाचं रेकॉर्ड झालं होतं. त्यावेळी मेंढीला आतापेक्षा ३५ टक्के कमी किंमतीला विकलं गेलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.