सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. हे देवस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुनही ओळखले जाते. या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पध्दतीने होतो. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत.
साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किमी अंतरावर असणारे शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांच मोठ श्रद्धास्थान महाराष्ट्रासोबत आंध्रप्रदेश ,कर्नाटक या राज्यातून मोठ्या स्वरुपात भाविक या यात्रेस हजेरी लावतात. हि यात्रा म्हणजे श्री.शंभु महादेव व देवी पार्वती यांचा विवाह सोहळा उत्सवाचा हा कार्यक्रम असतो. पाडव्याच्या मुहुर्तावर हळदी लावण्याचा कार्यक्रम, चैत्र शुध्द पंचमीस श्रींचा विवाह सोहळा असतो.
शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेला लाखो भाविकांची हजेरी pic.twitter.com/pTRsT4AQm2
— santosh gurav (@santosh29590931) April 2, 2023
या गडावर मुंगीघाटातून हजारो कावडी गड चडून वर येतात. येणाऱ्या कावडीमध्ये सासवड येथील मानाची तेल्याभुत्याची कावड ही सगळ्यात शेवटी रात्री उशिरा गडावर पोहचते आणि त्याच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. हि कावड हाताची मानवी साखळी करुन घाटातूनवर चढवली जाते. दुपारनंतर घाटातून कावडी मंदीराकडे यायला सुरुवात होणार आहे.