हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या जगात तरुण वर्गाचा कल डॉक्टर शिक्षक आणि इंजिनियर बनण्यासाठी जास्त झुकताना दिसत आहे. मात्र अशा काळात एका तरुणाने इंजीनिअरिंग ची नोकरी सोडून टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुणाचा हा निर्णय आज यशस्वी देखील झाला आहे. हा तरुण टोमॅटो शेती व्यवसायात लाखो पेक्षा जास्त पैसे कमवत आहे. राजेश रंजन असे या शेतकरी तरुणाचे नाव असून आज आपण त्याच्या शेतीच्या प्रयोगाला यश कसे आले हे जाणून घेणार आहोत.
झारखंडमधील जमशेदपूर येथील राजेश रंजन या तरुणाने गेल्या काही काळात आपली इंजिनिअरिंगची नोकरी सोडली. यानंतर त्याने गावाकडेच शेती करण्यास सुरुवात केली आणि सरकारच्या मदतीने एक पॉलिहाऊस उभारले. या पॉलिहाऊस मध्ये त्याने दोन प्रकारचे टोमॅटो लावले. यास टोमॅटो मधून त्याला लाखोंचे उत्पन्न मिळाले. आज राजेशच्या टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत आहे. तसेच एका तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचे चहूबाजूंनी कौतुक करण्यात येत आहे.
पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड
राजेशने सांगितले की, जेव्हा तो शहरातून परतला. त्यावेळी त्याला गावातील शेतकरी मेहनती आहेत गावात सुपीक जमीन आहे हे लक्षात आले. आपल्याला फक्त आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज पडेल ही बाब त्याच्या लक्षात आली. यानंतर त्याने पंतप्रधान योजनेचा लाभ घेत एफपीओ स्थापन केला. यातूनच त्याला फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाचे सहकार्य लाभले. पुढे त्याने गावात पॉलिहाऊस बांधले आणि त्यामध्ये टोमॅटोची लागवड केली.
आज कमवतोय लाखो रुपये
राजेशच्या पॉलिहाऊसमध्ये सध्या, 600 टोमॅटोची रोपे आहेत. ही रोपे 8 फूट ते 12 फूट उंचीची असून यातून 250 ते 300 किलो टोमॅटोचे उत्पादन राजेशला मिळते. सुरुवातीला तो टोमॅटो साठ रुपये किलो दराने विकत होता. परंतु आता टोमॅटोचे दर उतरल्यामुळे तो हे टोमॅटो कमी दारात विकतो. असे असताना देखील राजेशने या हंगामात 80000 रुपयांची कमाई केली आहे.