कौतुकास्पद!!! तरुणाने बनवला 40 तास जळणारा दिवा

या शिल्पकलेसाठी तरुण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीला दिव्यांची आरास लावली जाते. त्यामुळे दिवाळीला दिव्यांच फार महत्व आहे. कोणी तेलाचा तर कोणी मेणाचा दिवा लावतं. काहीजण दीप लावतात. हे दीप साधारण 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5 तास राहतात. त्यावर त्यांना सतत तेल घालत राहावं लागतं किंवा ज्योत संपली की दिवा विझून जातो. पण छत्तीसगडमधील एका तरुणानं तब्बल 40 तास जळत राहिल असा मातीचा दिवा तयार केला आहे.

या तरुणाला त्याच्या या शिल्पकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. कोरोना काळात त्याला या दिव्याच्या ऑनलाइन ऑर्डस देखील येत आहेत. छत्तीसगडमधील कोंडागाव येथे राहणारा एक कारागीर अशोक चक्रधारी याने मातीचा दिवा तयार केला आहे. हा दिवा साधारण 24 ते 40 तास जळत राहातो.

दरम्यान यासाठी तरुणाला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. अशोक चक्रधारी हे व्यवसायाने एक शिल्पकार आहेत आणि ते बर्‍याच वर्षांपासून तेच काम करत आहेत. अलीकडे, या तरुणानं असा मातीचा दिवा बनविला आहे, जो 24 ते 40 तास सतत जळत राहतो. यासाठी त्यांचा गौरवही झाला आहे. 35 वर्षांपूर्वी असाच दिवा पाहिला होता आणि हे लक्षात ठेवून त्याने हा दिवा बनवल्याचा दावा अशोकने केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like