औरंगाबाद | मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून, दोघांनी तरुणावर चाकूने वार केल्याची घटना दौलताबाद मधील राजवाडा भागात घडली आहे. यामध्ये अजय शामलाल गायकवाड, वय-19 (रा. अशोक नगर शहा बाजार, राजवाडा) हा जखमी झाला आहे.
दोन महिन्यापूर्वी राजू खरात (रा. शहाबाजार अशोक नगर) यांच्या घरातील फरशी बसविण्याचे काम अजय त्याच्या वडिलांनी घेतले होते. या कामाचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी खरात सोबत अजय व त्याच्या वडिलांचा वाद झाला. त्याच्याशी अधिक वाद नको म्हणून, अजय हा काही दिवसापूर्वी दौलताबाद येथील राजवाडा भागात राहणाऱ्या आत्याकडे गेला होता.
11 जुलै रोजी दौलताबाद बस स्टँड वरून आत्याच्या घराकडे पायी जात असताना, दुचाकीवर आलेल्या खरात व त्याच्या साथीदाराने अजयचे दोन्ही हात धरून ठेवत चाकूने वार केला. यामध्ये अजय गंभीर झाला असून तसेच तेथून पळ काढताना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राठोड हे करत आहे.