भावानेच केली लहान भावाची 10 लाखाची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पैठण : भावानेच भावाची तब्बल दहा लाख रुपयाची फसवणूक केली. हा प्रकार पैठण शहरातील रंगारहट्टी येथे उघडकीस आला. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारणी पैठण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण शहरातील रंगारहट्टी परिसरात राहणारे मयूर भास्करराव वैद्य यांनी आपल्या वडीलोपार्जित घरच्या मिळकती मधील वारसा हक्क सोडून देण्यासाठी इतर घर 10 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले.

पण,नंतर अनिकेत वैद्य हा बदलला. तुला जर मालकी हक्कावंर माझी सही लागत असेल तर मला अजून पाच लाख रुपये द्यावे लागतील असा प्रस्ताव त्याने मयूर वैद्य याच्यापुढे मांडला. दहा लाख रुपये दिल्याचा करार केलेला असताना देखील अनिकेत वैद्य यांनी न्यायलयामध्ये मालकी हक्कसाठी हरकत घेतली.

सदरील प्रकरणात फसवणूक झाल्याने मयूर वैद्य विरुद्ध कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागळे तसेच पोलीस जमादार ए टी भटकर, आर. डी आटोळे हे करीत आहे.

Leave a Comment