…म्हणून अमित शहांनी घेतला ‘हा’ तडकाफडकी निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय गृह विभागाची प्रिसिद्धीविषयक काम पाहणाऱ्या मीडिया विंगवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कमालीचे नाराज झाले आहे. यामुळे त्यांनी संपूर्ण मीडिया विंग बदलली आहे. या बदलामध्ये या टीमच्या प्रमुख वसुधा गुप्ता यांची बदली प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) सत्यशोधन विभागाच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. तर, भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) वरिष्ठ अधिकारी नितीन वाकणकर यांच्या नेतत्वाखालील नव्या टीमची नियुक्ती करण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहा गृह विभागाच्या मीडिया विंगच्या वारंवार झालेल्या चुकांमुळे नाराज होते. यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय वादात सापडून तो चर्चेचा विषय बनला होता. ही टीम बदलण्यामागील हेच कारण असल्याचे ‘द टेलिग्राफ’ने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामगिरीच्या यादीतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मुद्दा वगळण्यात आला. प्रसिद्धी टीमचा हा हलगर्जीपणा अमित शहांसह इतर अधिकाऱ्यांना जराही रुचला नाही असं ‘द टेलिग्राफ’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या प्रसिद्धीबाबत मीडिया विंगवरील नाराजी ताजी असतानाच गेल्या आठवड्यात, मंत्रालयाच्या ४ सदस्यांनी बंगालमधील चक्रीवादळाच्या वेळी व्यस्त असलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांची छायाचित्रे व्हिस्कीच्या बाटल्यांसोबत अपलोड केली होती. त्याचबरोबर निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये येणाऱ्या किराणा मालाच्या सामानाची यादी सार्वजनिक केल्याबद्दलही गृहमंत्री अमित शहा गृह विभागाच्या मीडिया विंगच्या कामावर कमालीचे नाराज झाले होते. या प्रकारांनंतर गृह मंत्रालयाने हा कठोर निर्णय घेण्याचे पाऊल उचलल्याचे ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment