Phaltan News : चोरी, मारहाण, जनावरांची कत्तल; फलटणमध्ये 5 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

phaltan police station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी पाहायला मिळत. मात्र याच जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दारूच्या नशेत मारहाण, फर्निचर दुकानात चोरी, गोमांस विक्रीसाठी नेताना ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त अशा घटनांचा समावेश आहे. चला त्याबद्दल सविस्तर आढावा घेऊ…

1) मलठण येथे फर्निचरच्या दुकानात चोरी

फलटण तालुक्यातील मलठण येथील एका फर्निचर दुकानात अज्ञात चोरट्यानी वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण ६५ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंती नाका फलटण येथील मारुती नारायण कचरे यांचे ओम गजानन फर्निचर असं या दुकानाचे नाव असून चोरटयांनी दुकानाच्या किचनच्या दरवाज्याचा कोयडा तोडून आत प्रवेश केला. या चोरीबाबत अधिक तपास पो. ना. घाडगे करीत आहेत.

2) कुशीनगर येथे १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

कुरेशीनगर येथे एका टेम्पोत लहान वासरे कत्तल करण्याच्या हेतूने बेकायदा डांबून ठेवल्याचे आढळून आले. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एक जणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गाडीसह एकूण १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस शिपाई काकासो कुंडलिक कर्णे यांनी या प्रकरणीशहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवालदार विरकर करत आहेत.

3) गॅलक्सी चौकात दोघाना मारहाण

दारूच्या नशेत एकास मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण येथील गॅलक्सी हॉटेल नाना पाटील चौकात मनोज इंगळे (रा. आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण) व त्याचा अनोळखी मित्राने दारुच्या नशेत फिर्यादी रिझवान मोहम्मद इलीयास खान (रा. संतोषीमाता नगर मलटण) शिवीगाळ दमदाटी करुन बिअरच्या तीन बाँटल व लोखंडी गज याने डोक्यात मारुन जखमी केले आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला.

4) कुशीनगर येथे गोमांस आढळले

कुरेशी नगर येथे एका चारचाकी गाडीत गोवंशीय मासाचे तुकडे कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस विक्री करण्यासाठी भरलेले आढळून आले. प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गाडी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

5) निंबळक येथे पती- पत्नीस मारहाण

निंबळक येथे जुन्या भांडणाच्या कारणातून पती- पत्नीस मारहाण केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा सुरेश पवार (रा. निंबळक ता. फलटण) यांनी याबाबतची फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी व फिर्यादीचा पती सुरेश पवार हे घरासमोर बसले असताना फिर्यादीचा दीर तपास्या आस्मान पवार व त्याची पत्नी जया तपास्या पवार यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस व फिर्यादीचे पती सुरेश पवार यांना मारहाण केली.