चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली आहे. या चोरटयांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असताना 16 ते 17 लाखांची रक्कम लंपास केली. या चोरटयांनी केलेल्या चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि घटना 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजायच्या सुमारास घडली आहे.
कशाप्रकारे घडली घटना ?
या बँकेचा कॅशिअर कामानिमित्त मॅनेजरच्या केबिनमध्ये गेल्यावर चोरट्यांनी हि संधी साधून चोरट्यांनी केबिनमध्ये शिरत थेट टेबलवरून ही रक्कम लांबवली. 500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले. बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये 2 संशयित आरोपींसोबत एक तरुणीसुद्धा असल्याचे दिसत आहे.
बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरदिवसा चोरी, चोरट्यांकडून 16 लाख लंपास pic.twitter.com/0FfiKDgSj8
— Vishakha Mahadik (@Princy_Vishu) February 1, 2022
या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांसोबत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या चोरटयांनी बँकेत चोरी करायच्या अगोदर बँकेची रेकी करत चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांसोबत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या बँकमधून 16 ते 17 लाख लंपास झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.