पाचगणी बाजारपेठेतून दुचाकीची चोरी ; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतून एक दुचाकी गाडी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मेहुल किशोर पुरोहित या हाॅटेल व्यावसायिकाची दुचाकी पोलिस स्टेशन समोरून चोरून नेली आहे.

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, मेहुल किशोर पुरोहित हे पाचगणी येथे हॉटेल व्यवसाय करीत असून ते मुख्य चौकातच वास्तव्यास आहेत. मेहुल पुरोहित यांनी आपल्या मालकीची लाल रंगाची सुजुकी एक्सेस गाडी क्रमांक (एमएच- 11 सीएफ – 7178) ही दि. 17 जुलै रोजी रात्री 10. 30 वाजता जुन्या पोलिस स्टेशन समोरील निहाल बागवान यांचे दुकानासमोर लावली होती.

दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आणण्यासाठी गेले असता, सदर ठिकाणी गाडी दिसत नसल्याने त्यांनी आजूबाजूला परिसरात शोध घेतला. परंतु गाडी कुठेही मिळून आली नाही. तसेच घरातील व नातेवाईकांकडे मित्रमंडळी यांचेकडे ही शोध घेतला, परंतु गाडी मिळून आली नाही. पुरोहित यांना आपली गाडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याचे खात्री झाल्याने त्यांनी आज पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave a Comment