…तर घाटीतील रुग्णसेवा बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू ठेवले असून काल काळ्या फिती लावून काम केले. आगामी दहा दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर रुग्णसेवेचे सहित सर्व कामकाज बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक संघटनांनी असहकार आंदोलन सुरू केलेले आहेत. आज सायंकाळी घाटी परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालय क्रांतीचौक असा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. 7 मार्च रोजी अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन, 8 मार्च रोजी अधिष्ठाता यांना घेराव, 9 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल तर 10 आणि 11 मार्चला अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर 14 मार्च पासून रुग्णसेवेसहित काम बंद आंदोलन करण्यात येईल.

या काळात अत्यावश्यक व कोविल सेवा चालू राहतील असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. मिर्झा सिराज बेग, सचिव डॉ. राधेय खेत्रे आदींनी कळवले आहे.

Leave a Comment